दिव्यांगांच्या मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 20, 2023 13:42 PM
views 41  views

देवगड : नारिंग्रे ग्रामपंचायत तसेच सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरावरील दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून नारिंग्रे येथे विभागीय स्तरावर दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे व अपंग वित्त महामंडळाचे पदाधिकारी नितीन परब यांनी शासकीय निमशासकीय योजनांची व सुविधांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना दिव्यांग साहित्य, उपकरणे व साधने या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चार अंध दिव्यांग बांधवांना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे ७० दिव्यांग बांधवांची सभासद नोंदणी करण्यात आली. यावेळी साईकृपा संस्थेच्या तालुकाध्यक्ष आरती बापट यांनी अहवाल वाचन केले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले. तर आभार सुनील बापट यांनी मानले.