
देवगड : देवगड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका प्रमुख पदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती करण्यात आली असून देवगड जामसंडे शहर अध्यक्षपदी नगरसेवक विशाल मांजरेकर व शहर उपशाखाप्रमुख पदी गणेश कांबळी (जामसडे) व प्रफुल्ल कणेरकर (देवगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विरोधी पक्ष नेते पदी नगरसेवक नितीन बांदेकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड येथे दिली. यावेळी नूतन देवगड तालुकाप्रमुख रविंद्र जोगल,युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर,विभाग प्रमुख विकास कोयंडे,तालुका महिला संघटक हर्षा ठाकूर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.