
देवगड : देवगड येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देवगड पोलिसांचं ‘रन फॉर युनिटी च देवगड येथे आयोजन करण्यात आल होत.याला देवगड तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी सकाळी पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून आणि देवगड येथील पोलीस ठाण्याच्या वतीने देवगड पोलीस ठाणे ते जामसंडे या २ की.मी.अंतरात रन फॉर युनिटी अशी एकता दौड काढण्यात आली. या वेळी दौड संपल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांनी देवगड पोलीस ठाणे येथे राष्ट्रिय एकात्मतेची शपथ दिली.
या भव्य दौडला पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी ,कर्मचारी पोलीस पाटील, सागर रक्षक सागर सुरक्षारक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.












