देवगड न. पं. च्यावतीने अमृत कलशाची मिरवणूक !

जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 07, 2023 19:21 PM
views 74  views

देवगड :  केंद्र शासनाच्या मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांनी जमा केलेले अमृत कलश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या कडे आज सुपूर्द करण्यात आले. यामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायतनेही अमृत कलशाची मिरवणूक काढत कलश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह देवगड-जामसंडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज मिरवणूक काढत अमृत कलश ओरोस येथे नेऊन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि इतर प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.