देवगड न.पं.च्या सर्वसाधारण सभेला विरोधी नगरसेवकांची दांडी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 23, 2023 12:56 PM
views 73  views

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये नळपाणी योजनेबाबत आवश्यक कारवाई विषयावर चर्चा होणार होती. यावेळी विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या सर्वसाधारणसाभेला दांडी मारल्याने नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. मात्र सर्व विरोधी नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चेला उधाण आल आहे.यावेळी आरोग्य शिक्षण सभापती विशाल मांजरेकर ,बांधकाम समिती सभापती तेजस मामघाडी, पाणीपुरवठा समिती सभापती संतोष तारी, मुख्याधिकारी सुरज कांबळे व अन्य अधिकारी कर्मचारी तसेच सत्ताधारी शिंदे गटाचे नगरसेवक रोहन खेडेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, मनीषा घाडी, स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे, उपस्थित होते.

या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नळपाणी योजना आवश्यक ती कार्यवाही याबाबत विषयांवर चर्चा होणार होती. विरोधी गटाचे नगरसेवक यांच्या अनुपस्थितीबाबत कोणतेही कारण समजू शकले नाही. स्वीकृत एक नगरसेवक व अन्य सात नगरसेवक एकूण आठ नगरसेवक यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या सभेत प्रामुख्याने देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील वेळवाडी सडा ते तुळशी नगरमध्ये जाणारी प्रादेशिक पाणीपुरवठा करणारी नवीन पाईप लाईन टाकणे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी योग्य ती कार्यवाही करण्याचे ठरले. त्याचबरोबर दहिबाव उदभावावर आधारित पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण व बळकटीकरण करणेबाबत या बैठकीत विचार विनिमय करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले,. देवगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना जैनंदिन संचलन व देखभाल दुरुस्ती या कामास मुदतवाढ देण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर या नगरपंचायत हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव नळ योजनेच्या व्यवस्थापनेच्या दैनंदिन कामाकरिता मनुष्यबळ सेवा पुरवठा करणेबाबत विचार विनिमय व सविस्तर चर्चा करून यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे ठरले. देवगड पवनचक्की मौजे जामसांडे सर्वे नंबर ५३४ मिळकती मधील जागा भाडेतत्त्वावर देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे सर्वांनुमते ठरविण्यात आले. स्थायी समिती सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. तसेच मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली.