कोंडामात आंबा चर्चा सत्र !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 28, 2024 09:03 AM
views 197  views

देवगड : यावर्षी आंबा हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस, वातावरणात सतत होणारे हवामानातील बदल, यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आज सर्व बागायतदार आर्थिक दृष्ट्या कोलमडून पडलेले आहेत. या आपत्तीतून बाहेर पडणेसाठी पुढील योग्य मार्गदर्शन व नियोजन करणे व विविध समस्यावर एकत्रित चर्चा करून त्यावर योग्य मार्ग काढण्यासाठी विशेष चर्चा सत्र हापूस संकट व संधी या चर्चा सत्राचे आयोजन ३१ मे रोजी श्री संत बाळूमामा देवालय कोंडामा या ठिकाणी स.९ ते दु.या वेळात करण्यात आले आहे.

या चर्चा सत्रात बागायतदार यांनी मोठया संख्येने एकत्र यावे. तसेच सर्व बागायतदारांनी यावे असे आवाहन अध्यक्ष विलास रुमडे आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ देवगड यांनी केले आहे.