विदेशी मार्केटमध्येही देवगड हापूसचीच क्रेझ !

तब्बल 1 लाख पेट्यांची बाजार समितीत आवक !
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 09, 2024 14:22 PM
views 48  views

देवगड : अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी 1 लाख हापूस आंब्याची पेटी बाजार समितीत आवक झाली तर  कोकणातून ४७ हजार तसेच इतर महाराष्टा्रतून 53 हजार पेट्यांची आवक झाली आहे. आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्ताला विशेष मुहूर्त आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी खर्‍या अर्थाने गुढीपाडव्यापासून आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी गेला. यंदा देवगड येथे पाऊस नसल्याने आंब्याचे पीक झोकात आले. 1 नंबर 60 फळांची पेटी आजही 2200 ते 2300 दराने इतक्या दराने विक्रीस मिळत आहे.

आज गुरुवार कोकणातून  ७० ते ८० हजार हापूस आंबा पेट्या नवी मुंबईच्या मार्केटला जातील, असे म्हटले जात आहे. कारण उद्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. आणि या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंब्याची मागणी आहे. यंदा जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये कोकण चा प्रसिद्ब देवगड हापूस जाऊन पोहोचला आहे. चढ्या दराने विक्री होत आहे. देशभरातील सर्व प्रसिद्ब मार्केटमध्ये देवगड हापूसने आपली छाप टाकली आहे.

अगदी सफरचंदसाठी प्रसिद्ब असलेल्या जम्मू काश्मिर राज्यात देखील कोकणच्या खार्‍या हवेतला देवगड हापूस विकला जात आहे. कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा लंगडा हापूस मागे पडला असून उलट त्या राज्यातून एकेकाळचा कोकणचा प्रसिद्ब देवगड हापूस येथील बागायतामधून विक्रीस काढण्या आला आहे. तरीही प्रथम मागणी कोकणच्या देवगड हापूसचीच होत आहे. दुबईच्या मार्केटमध्ये देवगड हापूसची पेटी 5,000 इतक्या दराने विकली जात आहे.