
देवगड : देवगड तालुक्यातील मळेगाव सरपंच पदी भाजपाच्या ऋषिका रुपेश झरकर विजयी झाल्या तर पडवणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पूर्वा जाधव या विजयी झाल्या आहेत
देवगड तालुक्यातील पडवणे व मळेगाव या दोन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली पडवडे ग्रामपंचायतचे सातही सदस्य बिनविरोध निवडून आले. तर मळेगाव ग्रामपंचायतच्या सात सदस्यांपैकी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले. तर दोन जागा रिक्त राहिल्या. या दोन्ही ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाची निवडणूक रविवारी पार पडली होती. सोमवारी सरपंच पदाच्या निवडणुकीची मतमोजणी देवगड तहसील कार्यालयामध्ये पार पडली.
पडवणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार पूर्वा जाधव यांना 215 मते भाजपाच्या समृद्धी परकर यांना 170 मते अपक्ष उमेदवार कल्पना जुवाटकर यांना 31 मध्ये व नोटा एक अशी मते मिळाली. या निवडणुकीत प्रल्हाद पायघन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
मळेगाव ग्रामपंचायत सरपंच पदाची थेट निवडणूक दुरंगी झाली. या निवडणुकीत भाजपाच्या ऋषिका झरकर यांना 243 तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रियल झरकर यांना 241 मते व नोटा पाच अशी मते मिळाली. मळेगाव ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर के सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
यावेळी पडेल मंडळाचे भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली युवा सेलचे उत्तम बिर्जे, माजी पंचायत समिती उपसभापती अनघा राणे, अजित राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.