देवगड भाजपकडून पोलीस पाटलांचा सन्मान..!

Edited by:
Published on: November 07, 2023 19:43 PM
views 258  views

देवगड : आमदार नितेश राणे यांच्या वतीने, देवगड तालुका भाजपाने आज देवगड तालुक्यातील पोलीस पाटलांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.या केलेल्या सत्काराने पोलीस पाटील भारावले .

आमची यापूर्वी कोणीही दखल घेतली नाही.पण आमदार नितेशजी राणे यांनी दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.तसेच पुढील काही दिवसात आमदार यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन व्यथा मांडणार असल्याचे प्रितीपादन यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या कडून करण्यात आले आहे. 

यावेळी पोलीस पाटील यांनी एक लेखी निवेदन आमदार नितेश राणे यांना देण्यासाठी पक्षाकडे दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की पोलिस पाटील हा गाव पातळीवरील राज्य शासनाचा एक महत्वाचा घटक आहे. पोलिस यंत्रणा आणि जनता यातील एक महत्वाचा दुवा इंग्रजांच्या राजवटी पासुन हे पद महाराष्ट्र राज्यात उपलब्ध आहे. परंतू इतके जुने पद असुन सुद्धा शासन दरबारी ते दुर्लक्षीत राहिले.

गावामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखने हे पोलिस पाटलांचे महत्वाचे काम आहे. या शिवाय गावातील अवैध्य धंदे, घातपात, अपघात, अनैसर्गिक मृत्यु, चोऱ्या, दरोडे, फसवणुक, खुन, मारामाऱ्या, बेपत्ता व्यक्ती, अपहरण, विनयभंग, छेडछाड अशा गोष्टी गावात घडू नये म्हणुन पोलिस पाटील यांना चोविस तास सतर्क रहावे लागते. यासाठी कामाची वेळ ठरलेली नाही. याशिवाय महसुल खात्याची कामे, वन खात्याची कामे, निवडणुक विभागाची कामे, भुमी अभिलेखची कामे, तंटामुक्तीची कामे, गावातील लोकांना दाखले देणे, न्यायालयाची नोटीस बजावन्यास बेलीप यांस मदत करणे, निवडणूक शाखेकडून गाव पातळीवर केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) म्हणून पोलिस पाटील यांची नियुक्ती केली जाते त्यामुळे मतदार यादीशी संबंधित सर्व काम करावे लागते. निवडणूकीच्या वेळी मतदान केंद्रांवर व्यवस्थापक म्हणून काम पहावे लागते. इत्यादी सर्व जबाबदारीची कामे पोलिस पाटील करित असताना त्याना दरमहा फक्त रु.६५००/- (सहा हजार पाचशे मात्र) एवढेच तुटपुंजे मानधन दिले जाते. सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पोलिस पाटील यांचा पुर्ण वेळ याच कामात जातो. त्यामुळेत्यांना दुसरे कोणतेही काम करता येत नाही. कुटुंबाचा उदर निर्वाह, मुलांचे शिक्षण, आजारपण, कपडा लत्ता या सर्व बाबी मानधनातुनच कराव्या लागतात. मानधन तुटपुंजे असल्यामुळे संसाराचे गाडे चालवताना पोलिस पाटलांना तारेवरची कसरत करावी लागते. महिन्यातुन १५ दिवस या ना त्या कारणाने तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावी लागते त्याचा प्रवास भत्ता दिला जात नाही. मानधन हेच पोलिस पाटील यांच्या कुटुंबाच्या उदर्निवाहाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे गांभिर्याने विचार करुन पोलिस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करुन मिळावी.

कोरोना महामारीच्या कालावधीत पोलिस पाटील यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचा त्यांना कोणताही मोबदला दिला गेला नाही कोरोना कालावधीत काम करणाऱ्या इतर सर्व कर्मचाऱ्यांना मोबदला दिला. जेव्हा जेव्हा या देशावर, राज्यावर संकट येईल तेव्हा आमचे पोलिस पाटील सर्वांच्या पुढे राहुन त्या संकटाचा सामना करतील. हे कोरोना महामारीच्या काळात सिद्ध झालेले आहे.

आपण एक तरुण तडपदार अन्याय विरुध्द लढणारे कर्तव्यदक्ष आमदार आहात. कोणताही प्रश्न विधानसभेत मांडून आपण सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देता त्यामुळे आम्हांला आपल्या बद्दल नितांत आदर आहे. पोलिस पाटील अधिनीयम १९६७ मध्ये बदल करून मानधनात भरघोस वाढ करून प्रवास भत्ता वाढवून मिळणे, नुतनीकरण बंद करावे, निवृत्तीचे वय ६५ करावे, निवृत्ती नंतर पेंशन मिळावी. दरमहा वेळेत मानधन मिळावे, निवृत्ती नंतर ठोस रक्कम मिळावी, निवृत्ती नंतर पोलिस पाटील यांच्या वारसांना भरती मध्ये प्राधान्य मिळावे. इत्यादी महत्वाच्या मागण्या प्रथम मार्गी लावाव्यात.

या सर्व मागण्या आपण आमदा नितेश राणे यांच्याकडे भेट घेऊन सुपूर्त करणार असल्याचे पोलीस पाटील संघटनेने सांगितले या सत्काराच्या वेळी  तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर जिल्हा सरचिटणीस संदीप साटम माजी आमदार अजित गोगटे, महिला पदाधिकारी प्रियांका साळस्कर, उषःकला केळुसकर, नगरसेवक व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.