
देवगड : सेवा पंधरवडा निमित्त देवगड भाजपच्यावतीने बसस्थानक स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त भाजपा देवगड मंडलच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी सकाळ ८.३० वाजता देवगड एसटी बस स्थानक संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ माजी आम .अजित गोगटे यांच्या हस्ते व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ फोडून देवगड बसस्थानक येथे करण्यात आले.
जिल्हा चिटणीस प्रकाश गोगटे, बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत ,शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, योगेश पाटकर, राजेंद्र वालकर, उल्हास मणचेकर, गणपत गावकर, नरेश डामरी, नगरसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर, शरद ठुकरुल, नगरसेविका आद्या गुमास्ते, मनीषा जामसंडेकर, स्वरा कावले, कावले, प्राजक्ता घाडी, मृणालिनी भडसाळे, देवगड जामसंडे नगरपंचायत अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी संपूर्ण बसस्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला होता.










