फणसगाव - विठलादेवी गावात १८ फेब्रुवारीपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 18, 2024 14:23 PM
views 70  views

देवगड : देवगड तालुक्यातील फणसगाव व विठला देवी गावातील श्री देव महादेव व श्रीदेवी महालक्ष्मी आणि श्रीदेवी महाकाली जीर्णोद्धार मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा 18 ते 29 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन श्रीदेवी महालक्ष्मी श्रीदेवी महादेव श्रीदेवी महाकाली या मंडळाचे मुंबई अध्यक्ष तथा फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबईचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध विठ्ठल नारकर यांनी केले आहे.

दिनांक 18 रोजी सकाळी साडेसात वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, सायकाळी ७ ते ९ आरती आणि पालखीतून मिरवणूक, रात्रि नऊ वाजता स्थानिक भजने.

दिनांक 19 फेब्रुवारी सकाळी ७ वाजता स्थापित देवतांची पूजा, आणि विविध पूजा पाठ आणि इतर धार्मिक कार्यक्रम, दुपारी एक वाजता महाप्रसाद सायंकाळी सात ते नऊ आरती आणि पालखीतून मिरवणूक, रात्री ९ वाजता विविध स्थानिक भजने, दि. २० डिसेंबर विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आरती, स्थानिक भजने. दि. 21 डिसेंबर सकाळी सात वाजता श्रीदेवी महालक्ष्मी जीर्णोद्धार मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना आणि विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी एक वाजता महाप्रसाद, संध्याकाळी सात वाजता आरती.

दिनांक 22 रोजी सकाळी साडेसात वाजता विविध धार्मिक कार्यक्रम आणि कोल्हापूर करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते कलशारोहण, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, संध्याकाळी सहा ते नऊ दीप उत्सव,आरती आणि पालखी मिरवणूक, रात्री नऊ वाजता ब्राह्मण देव महिला मंडळाचे समई नृत्य.

दिनांक 23 रोजी सकाळी साडेसात वाजता विविध धार्मिक कार्यक्रम दुपारी एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी सात ते नऊ आरती व पालखी मिरवणूक, रात्री नऊ वाजता देवगड नाडन येथील श्री महादेव प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे विरुद्ध कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विजय उर्फ गुंड्या सावंत यांच्यामध्ये भजन डबलबारी चा सामना होणार आहे.

दिनांक 24 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम..दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता धार्मिक कार्यक्रम,दुपारी एक ते तीन महाप्रसाद रात्री नऊ वाजता आरती., दि २६ फेब्रुवारी सकाळी साडेसात वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, दुपारी ९ वाजता माझी माय बोली राधानगरी प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची हा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक 27 फेब्रुवारी सकाळी साडेसात वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, रात्री नऊ वाजता दिंडी भजन, दिनांक 28 फेब्रुवारी सकाळी सात वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, संध्याकाळी चार ते सहा हळदीकुंकू कार्यक्रम, रात्री नऊ वाजता विविध स्थानिक भजने, दिनांक 29 फेब्रुवारी संध्याकाळी चार ते सहा शिखर ध्वज, दंड प्रतिष्ठापना (कलशारोहण) करवीर पिठ कोल्हापूर चे जगद्गुरु स्वामी शंकराचार्य यांच्या शुभहस्ते होणार आहे .

या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई या संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध नारकर आणि सर्व ग्रामस्थांनी केले आहे.