
देवगड : देवगड तालुक्यातील शेठ म.ग.हायस्कूल च्या शिक्षिका आफरीन वसीम पठाण यांना गुरु सेवा सन्मान पुरस्कार' प्राप्त झाला आहे.नामदार दीपक केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी मार्फत दरवर्षी शिक्षकांना वर्षभरातील उत्तम कामगिरीबद्दल दिला जाणारा' गुरु सेवा सन्मान पुरस्कार' प्रदान केला जातो यावर्षी २०२५-२६ आमच्या शेठ म.ग. हायस्कूल, देवगड शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आफरीन वसीम पठाण यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल माध्यमिक विभाग या गटामध्ये प्राप्त झालेला आहे.
आतापर्यंत आफरीन पठाण यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी नाट्य, कला, इतिहास, मराठी कार्यानुभव या विषयांचे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत. तसेच राज्य शासनाच्या नवोपक्रम स्पर्धेमध्ये देखील त्यांनी यश मिळविलेले असून जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थे मार्फत मूल्य रुजवणूक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये देखील त्यांनी यश मिळविलेले आहे.त्यांना यावर्षी मिळालेल्या गुरु सेवा सन्मान पुरस्काराबद्दल देवगड एज्युकेशन बोर्ड,मुंबई तसेच स्थानीय समिती पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच पालक व विद्यार्थी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.