
देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या देवगड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ च्या बुद्धिबळ क्रीडाप्रकारात मुलांच्या १९
वयोगटाखालील जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या कुमार- वेद राहुल गोगटे याने देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर याच वयोगटात कुमार - निधीश पराग हिरनाईक याने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.व मुलींच्या १९ वर्षाखालील वयोगटात कुमारी- राधिका चंद्रशेखर वालकर हिने तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात कुमारी- मृणाल नारायण माने हिने तालुक्यात चौथा व याच वयोगटात मुलांमध्ये कुमार- मनोमय मृत्युंजय मुणगेकर याने तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका.प्रज्ञा नारायण चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड.अजितराव गोगटे, सचिव प्रवीण जोग , शाला समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर , क्रीडा समिती अध्यक्ष.प्रशांत वारीक , मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.