
देवगड : देवगड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार प्रशालेत शालेय मंत्रिमंडळ निवडणुक' प्रक्रिया उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पाडली जाते हे समजण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर व सर्व सहकारी शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री म्हणून कु.प्रणव ठाकूर हा विद्यार्थी बहुमताने विजयी झाला.सर्व शिक्षकाने त्याला शुभेच्छा दिल्या.सर्व शिक्षकांच्या सहकार्याने तसंच सर्व शिक्षकांनी या मतदान प्रक्रियेला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार यावेळी मानण्यात आले.त्याचप्रमाणे समाजशास्त्र विभाग प्रमुख चनबसुगोळ मॅडम यांनी ही शालेय मंत्रिमंडळ निवडणुक`प्रक्रिया`पार पाडली. तसेच या मतदान प्रक्रियेत सर्व प्रशालेतील विद्यार्थी आवडीने आपापल्या पद्धतीने काम करत होती.