
देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे येथे शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं २, येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विजय क्रीडा मंडळ, साई हिल, भांडुप (प.), मुंबई यांच्या सौजन्याने व संतोष मयेकर यांच्या माध्यमातून व शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे सदस्य संतोष मयेकर, दाभोळे गावच्या पोलीस पाटील सानिका कदम, मुख्याध्यापिका स्वाती राजेंद्र हिंदळेकर, उषा मुकुंदा मस्के (उप शिक्षिका ), शाळा समिती अध्यक्ष गुरु बावकर, ग्रामस्थ विजय कुळकर, अप्पा घाडी, गौरव चव्हाण व इतर ग्रामस्थ व शिक्षक वर्ग उपस्थित होते. या उपक्रमाकरीता सहकार्य करणारे सदस्य, हितचिंतक, देणगीदार यांचे यावेळी संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.