LIVE UPDATES

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठानकडून वृक्षलागवड

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 08, 2025 16:31 PM
views 46  views

देवगड : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठान कडून देवगड तहसील आवारात वृक्षलागवड करण्‍यात आली.वृक्षलागवडी नंतर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठान च्‍या सर्व सेवकांचे तहसीलदार रमेश पवार यांनी आभार मानताना संत तुकाराम महाराजांच्‍या अभंगातील वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंग पंक्‍तीचा दाखला दिला.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठान च्‍या वतीने देवगड तहसील आवारात विविध प्रकारची झाडे लावण्‍यात आली. यावेळी प्रतिष्‍ठानचे देवगड व आजुबाजुच्‍या विविध गावातील शेकडो सेवक सेवाभावी वृत्‍तीने या उपक्रमांत सहभागी झाले होते.

तह‍सीलदार पवार यांनी देवगड तहसील कार्यालयाचा पदभार स्विकारल्‍यानंतर तहसील इमारत शुशोभिकरण ते सर्वसामान्‍य जनता यांच्‍या सोयीसुविधा व कामकाजात कमालीचा बदल घडवून आणलेला आहे.आपल्‍या कार्यालयाच्‍या आवारात नैसर्गिक वातावरण तयार करण्‍याच्‍या उद्देशाने झाडेलावण्‍याचे उध्‍दीष्‍ठ मनात ठेवले होते. या उध्‍दीष्‍ठाला धर्माधिकारी प्रतिष्‍ठान कडून हातभार लाभला. यामुळे पवार यांनी सर्वसेवाकांचे आभार मानताया वृक्ष वल्ली यांच्या पासून आपल्याला खुप फायदे आहेत, सजीवांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करण्याकडेच आपण सर्वांनी वळलं पाहिजे असे सांगून सर्वांचे आभार मानले.यावेळी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठानचे काका राऊत, संजय पराडकर व विविध ठिकाणचे पदाधिकारी सेवक उपस्थित होते.