
देवगड : गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा (GST) २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत जामसंडे येथील मुकुंदराव फाटक विद्यालयाच्या कुमार - दुर्वेश लक्ष्मण घाडीगांवकर , इयत्ता-१ ली याने राज्यात व जिल्ह्यात ११ वा व कुमारी- श्रुतिका सचिन घुंगरेपाटील , इयत्ता १ ली हिने राज्यात १२ वा व तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
तसेच याच विद्यालयाच्या कुमार - वेद नारायण चव्हाण इयत्ता -२ री याने जिल्ह्यात तिसरा व कुमार -हिमांशू नारायण चव्हाण इयत्ता ४ थी याने तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना रश्मी प्रशांत नारिंग्रेकर ,.कोमल ओंकार, खाजनवाडकर , चेतन चंद्रकांत पुजारे ,वैभवी योगेश जोग यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष-अॅड.अभिषेक गोगटे ,सचिव-प्रवीण जोग , शाला समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर ,मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.