
देवगड : ठाकूर सरांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करताना मूल्यशिक्षणाला तेवढेच महत्त्व दिले.विद्यार्थ्यांमध्ये शिस्त , प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.असे मत यावेळी मा.आ.अजित गोगटे यांनी व्यक्त केले.
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक विनायक ठाकूर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळा व विद्याविकास मंडळ या संस्थेमार्फत व नंदूशेठ घाटे यांच्या वतीने शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन गोगटे प्रशालेच्या नलावडे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी विचारमंचावर संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड.अजितराव गोगटे, सचिव - प्रवीण जोग , शुभेच्छामूर्ती विनायक ठाकूर,.ठाकूर , शाला समिती अध्यक्ष-प्रसाद मोंडकर, महेश रानडे ,.नम्रता तावडे, सुधीर आचरेकर , प्रकाश गोगटे , संतोष कुलकर्णी , मुख्याध्यापक सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थाध्यक्ष भावनिकरित्या सत्काराला उत्तर देताना ठाकूर सर म्हणाले की ही सेवा माझ्यासाठी केवळ नोकरी नव्हती, ती माझी जबाबदारी आणि आवड होती.शाळेने मला जे दिले त्याचा मी सैदव ऋणी राहीन अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती श्री.नंदूशेठ घाटे , श्री.प्रकाश गोगटे , श्री.प्रसाद मोंडकर , तर विद्यार्थ्यांमधून कुमारी - दुर्गा भिडे , कुमारी- आर्या मणचेकर , माजी विद्यार्थी श्री.ऋत्विक धुरी, तसेच शिक्षकांमधून विनायक जाधव ,संजीवनी जाधव , चेतन पुजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रज्ञा चव्हाण व आभार संजय पांचाळ यांनी व्यक्त केले .