पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून विजयदुर्ग आगरासाठी ०५ एसटी बस

Edited by:
Published on: June 24, 2025 20:59 PM
views 124  views

देवगड :  पालकमंत्री नितेश राणे यांच्या विnशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारकरिता BS 6 प्रकारातील नवीन 05 एसटी बस गाड्या प्राप्त झाल्या सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी नितेश राणे यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या नवीन बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी  पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, रवी पाळेकर, उत्तम बिर्जे , पडेल सरपंच भूषण पोकळे , विजयदुर्ग सरपंच रियाज काझी,महेश बिडये, प्रसाद देवधर, निलेश मणचेकर, महेश चव्हाण,  ग्रेसिस फर्नांडिस,  महिला मोर्चा पडेल मंडळ,अध्यक्षा संजना आळवे, ग्रामपंचायत सदस्या शुभा कदम ,प्रतिक्षा मिठबाकर,पूर्वा लोंबर, गीता लळीत, विजयदुर्ग आगार व्यवस्थापक विवेक जमाले, विजयदुर्ग स्थानक प्रमुख सचिन डोंगरे, विजयदुर्ग ग्रामपंचायत अधिकारी अमेय वारे , दर्शन डोंगरे, दिपक मिठबवाकर, अमित दत्ताराम डोंगरे, योगेश डोंगरे, सर्व विजयदुर्ग आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, चालक वाहक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.