इंग्रजी जागतिक संवादाची ताकद असलेली भाषा : निरंजन दीक्षित

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 24, 2025 16:17 PM
views 18  views

देवगड : आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा हे केवळ शिक्षणाचे माध्यम नाही,तर ती एक जागतिक संवादाची ताकद बनली आहे.इंग्रजीवर प्रभुत्व मिळवल्यास नोकरी , व्यवसाय ,तसेच सामाजिक संवादाच्या नव्या संधी खुल्या होतील असे प्रतिपादन स्वर्गीय दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजनजी दीक्षित यांनी व्यक्त केले.

जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या नलावडे सभागृहात स्वर्गीय नीलकंठ श्रीधर दीक्षित फाउंडेशन व कुशल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर चालणाऱ्या इंग्लिश कम्युनिकेशन ट्रेनिंग वर्गाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे , अॅड.अभिषेक गोगटे , मनेरकरप्रशांत वारीक, प्रसाद मोंडकर, मुख्याध्यापक सुनील जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.