LIVE UPDATES

दुर्दैवी घटना | ST - रिक्षा अपघातात चार जणांचा मृत्यू

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 20, 2025 19:35 PM
views 358  views

देवगड : देवगड ST पघाताता चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे एसटी व रिक्षामध्ये झाला.अपघातामध्ये चार जण ठार झाले असून ही घटना सायंकाळी ४.३० वाजता घडली.  या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

संकेत सदानंद घाडी  ( ३५ आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर ( ३५ आचरा गाऊडवाडी ,रोहन मोहन नाईक ( ३५ आचरा गाउडवाडी), सोनू कोळंबकर ( ४५ आचरा पिरावाडी ) यांचा अपघातातजागीच मृत्यू व रघुनाथ बिनसाळे गंभीर जखमी झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी गोवा येथे हलवले आहे.