संजय गांधी निराधार योजनेचे पंधरा लाभार्थ्‍यांचे प्रस्‍ताव मंजूर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 13, 2025 19:56 PM
views 126  views

देवगड : तहसीलदार आर.जे.पवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या संजय गांधी निराधार योजना बैठकित पंधरा लाभार्थ्‍यांचे प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले. या बैठकिला देवगड जामसंडे नगर पंचायत मख्‍यकार्यकारी अधिकारी सुरज कांबळे, नायबत तहसिलदार सुरेद्रकाबळे, सहायक महसूल अधिकारी एस. बी. साळूंखे उपस्थित होते.

प्रस्‍ताव मंजूर लाभार्थ्‍यांमध्‍ये संजय गांधी विधवा निराधार योजनेंतर्गत ५, घटस्‍पोटीत १, दिव्‍यांग ३ व श्रावणबाळ योजनेंतर्गत ६ प्रस्‍तावांना मंजूरी देण्‍यात आली. यामध्‍ये अंकिता अभिजीत राणे रा.बापर्डे,उर्वशी उमेश घाडी रा.वळीवंडे,नम्रता रविंद्र तावडे रा. जामसंडे,राजेश्री राजेश माटवकर रा.पोयरे, सारिका संतोष माने रा. जामसंडे, स्‍वप्‍नाली यशवंत देऊलकर रा.देवगड, अलका दत्‍ताराम सावंत रा.दहिबांव, प्रदिप सहदेव धुरी रा.तळवडे, सौरभ सुनिल तोरासकर रा.महाळूंगे, राजश्री यशवंत दळवी रा. दहिबांव, यशवंत दत्‍ताराम दळवी रा.दहिबांव, मिनाक्षी किसन घाडी रा.गोवळ, रविंद्र तुकाराम शिवलकर रा.दहिबांव, विठ्ठल सोनू कदम रा.इळये, सुर्यकांत शिवराम मालवणकर रा.गिर्ये आदी लाभार्थ्‍यांना लाभमंजूर करण्‍यात आलेला आहे. या बैठकित त्रृटींच्‍या पुर्ततेवर एक प्रस्‍ताव प्रलंबित ठेवण्‍यात आला.