
देवगड : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची वाटचाल शाश्वततेकडे होण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण होणे गरजेचे आहे त्यासाठी पाणी पुरवठा योजनेची संबधित प्रतिनिधींसाठीचे हे प्रशिक्षण महत्त्वाचे असुन पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या समुदायांमध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या पद्धतीना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले .
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ( स्तर-३ ) टप्पा -३ च्या ५ प्रतिनिधींचे पाणी पुरवठा योजनेशी निगडीत ग्रामपंचायत स्तरावरील भागधारकांसाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक दोन दिवशीय अनिवाशी प्रशिक्षण देवगड इंद्रप्रस्थ हॉल येथे जि.प सिंधुदूर्ग व जे. पी.एस. फाऊंडेशन लखनौ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी सरपंच , ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका , आशा , जलसुरक्षक , ग्राम पंचायत सदस्य , बचतगट प्रतिनिधी , आरोग्य सहाय्यक आदी उपस्थित होते .
या प्रशिक्षणामध्ये पाण्याचे स्रोत आणि त्याचे महत्त्व , समुदाय आधारित स्त्रोत व्यवस्थापन , भूजल संशोधनाच्या पद्वधती आणि तंत्रे , भूजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया ,भूजल पुनर्भरणाची तंत्रे , भूपृष्ठावरील पाण्याच्या पुनर्भरण पद्धती , भूजल पुनर्भरणाच्या नदी -नाले तंत्र , पाणी पट्टीचे महत्त्व , ग्राम आरोग्य , पोषण , पाणी पुरवठा , व स्वच्छता समितीच्या भुमिका व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन क्षमता बांधणी व प्रशिक्षण इंदिरा परब , मास्टर ट्रेनर हर्षदा वाळके , मास्टर ट्रेनर श्रद्धा खाडे , मास्टर ट्रेनर फिजा मकानदार , मास्टर ट्रेनर जयराम जाधव , मास्टर ट्रेनर वसंत कदम यांनी केले .
या प्रशिक्षणामध्ये २ व ३ तारीख ला तीन बॅच करण्यात होते . या बॅचला प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) तेंडुलकर ,विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) हळदणकर , आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु , आरोग्य विस्तार अधिकारी गंगुताई अडुलकर , गट समन्वयक वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर , डाटा ऑपरेटर मोहिनी खडपरकर, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा पोवार आदी मान्यवर उपस्थित होते . तर ५ व ६ तारीख ला ३ बॅच करण्यात आले होते . या प्रशिक्षण कार्यक्रमात गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र सोहळा संपन्न झाला .या प्रशिक्षणाचे प्रस्तावणा इंदीरा परब , सुत्रसंचालन विनायक धुरी व आभार वैशाली मेस्त्री यांनी मानले .