
देवगड : देवगड येथील येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर 'नाट्य महोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. युथ फोरम, देवगड आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून हे आयोजन दि. १७ व १८ मे रोजी सायंकाळी ७ वा. देवगड येथे करण्यात आले आहे.
नाट्य महोत्सवांतर्गत दर्जेदार सहा एकांकिकांची नाट्य मेजवानी प्रेक्षकांना मिळणार असून यात - रत्नागिरी, चिपळूण, कुडाळसह देवगडमधील नाट्य कलाकृतींचा समावेश आहे. कलाकार, नाटक आणि रसिक प्रेक्षकांना एकत्र आणून देवगडमधील बंद - पडलेल्या नाट्य चळवळीला उर्जितावस्था देण्यासाठी - युथ फोरम- देवगडने हे अभिनव पाऊल उचलले आहे, अशी माहिती युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगावकर व भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली आहे.
नाट्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत संयुक्तपणे माहिती देताना अॅड. माणगावकर व श्री. साटम म्हणाले, स्थानिक कलाकारांना नाटकासाठी मुंबई, पुणे येथे न जाता आपल्या गावात व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा आमचा मानस आहे. नाट्य महोत्सवाचे हे पहिले पर्व आहे. या नाट्य महोत्सवानंतर प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांचा ओघ वाढून स्थानिक कलाकारांना संधी मिळेल..
या नाट्य चळवळीतून शासनाच्या माध्यमातून देवगडमध्ये एक प्रशस्त नाट्यगृह उभे राहील,अशी अपेक्षा त्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून युथ फोरम ही संस्था पाठपुरावाही करणार आहे. तालुक्यातील वरिष्ठ आणि नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांना एकत्र आणून त्यांनी कलेल्या कार्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. नाट्य महोत्सवाच्या दोन दिवसांत विविध विषयांवरील सहा दर्जेदार नाट्य एकांकिकेचे सादरीकरण होणार आहेत. १७ मे रोजी सायंकाळी ७ वा. शेठ म. ग. हायस्कूल निर्मित 'हमावणी' (लेखिका /दिग्दर्शिका सौ. आज्ञा अभिषेक कोयंडे), रात्री ८ वा. नाट्यशोध रत्नागिरी निर्मित 'कुपान' (लेखक कृष्णा वाळके, दिग्दर्शक गणेश राऊत), रात्री ९ वा. 'ढ' मंडळी, कुडाळ निर्मित 'वाल्मिकी' (लेखक / दिग्दर्शक तेजस मसके या नाट्य एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. तर १८ मे रोजी सायंकाळी ७ वा. डी. बी. जे. हाऊसफुल्ल नाट्यसंस्था - चिपळूण निर्मित 'लेटर बॉक्स १४३' (लेखक यश नवले, दिग्दर्शक- भावेश कुंतला, नितीन सावले), रात्री ८ वा. उढङढखउ उीशी, देवगड निर्मित 'वन पीस' (लेखक मयुर साळवी, दिग्दर्शक आकाश सकपाळ), रात्री ९ वा. श्री सम र्थ कलाविष्कार, देवगड निर्मित 'मशाल' (लेखक
अनिरूद्ध नारिंग्रेकर, दिग्दर्शक- विजय कदम) या नाट्य एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. याचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. माणगावकर,भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी केले आहे.यावेळी भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ,पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, युवामोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, युथ फोरमचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ऋत्विक धुरी, कार्यक्रम प्रमुख आकाश सकपाळ आदी उपस्थित होते.