
देवगड : श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि कॅन्सर पेशंट्स एड् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या आरोग्य शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपविभागीय अधिकारी कणकवली जगदीश कातकर यांनी या शिबिरास भेट दिली.
यावेळी ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली,उपाध्यक्ष गणेश वाळके, सरपंच महेश ताम्हणकर,माजी ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,रामदास तेजम,संजय वाळके,तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये रक्त तपासणी, कान नाक घसा तपासणी, रक्तदाब (ब्लडप्रेशर), आणि फुफ्फुसे तपासणी, स्त्री-रोग/स्त्रीस्तन कर्करोग तपासणी, सर्जीकल तपासणी व अन्य अत्यावश्यक तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडुन मोफत करण्यात आल्या मुंबई येथील महालक्ष्मी येथे मुख्यालय असलेली सीपीएए कर्करोगावर अत्यंत मुलभुत आणि व्यापक काम करत असलेली संस्था म्हणुन प्रचलित असुन या शिबिराच्या माध्यमातुन केवळ कर्करोग नव्हे तर जनरल सर्जरी, कान नाक घसा, फिजिशियन, स्त्रीरोग अशा विविध शाखांचे डॉक्टर सहभागी झाले होते.