
देवगड : देवगड तालुक्यातील युवती छेडछाड प्रकरणी सातव्या आरोपीचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी देवगड पोलिस स्टेशनमध्ये डीवायएसपींची भेट घेतली असून, युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना शिक्षा होईल असा तपास करा, या गुन्हयात वापरलेली गाडी घेवून जाणाऱ्या सातव्या संशयितांचा शोध घ्या अशी मागणी देवगडमधील ग्रामस्थांनी पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आडाव यांच्याकडे केली आहे. यावेळी अॅड. प्रसाद करंदीकर, अॅड. सिध्देश माणगांवकर, सुधीर मांजरेकर,राजू पाटील, रविकांत चांदोस्कर, सुरेश उर्फ पपु कदम, बंटी कदम, सौरभ सहस्त्रबुध्दे, ऋत्विक धुरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पोलिस निरिक्षक अरूण देवकर, मनोज सोनवलकर आदी अधिकारी उपस्थित होते.