देवगड किल्ला हनुमान मंदिरात सप्तप्रहरांचा हरिनाम सप्ताह

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 10, 2024 13:06 PM
views 110  views

देवगड : देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिरातील सप्तप्रहरांच्या हरिनाम सप्ताहास उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी श्री हनुमंताची आरती करून सप्ताहास सुरुवात झाल्यामुळे किल्ला येथील ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला….,पवनसुत हनुमान की जय… बोल बजरंग बली की जय अशा जय घोषणा करीत मंदिर परिसरात दुमदुमून निघाला होता.

यावेळी मारुतीनेसवणकर, शिवराम निकम, आनंद भाटकर, उल्हास मणचेकर, महेश सागवेकर, गुरु वाडेकर,शरद शिंदे, जयराम कदम,बंटी वाडेकर,अमित गोळवणकर, प्रवीण गोळवणकर, केदार तेली, प्रमोद खवणेकर, चेतन प्रभू, उमेश बांदकर, अशोक गोळवणकर,प्रकाश भोवर, वैभव हरम, राजा निकम, सूर्यकांत पाळेकर आदी देवगड किल्ला येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी रात्री परिसर दिंडी नृत्यांनी निघणार आहे. आज दिवसभरात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे.