देवगड शहराच्या कचरा डेपोसाठी स्वमालकीची जागा !

योगेश चांदोस्कर यांची माहिती
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 15, 2024 13:30 PM
views 319  views

देवगड : देवगड, जामसंडे शहरातील कचरा प्रश्न न. पं. सत्ताधाऱ्यांमुळे गंभीर स्वरुपाचा बनला आहे. न. पं. प्रशासनाने न. पं. कार्यालयानजीकच तात्पुरत्या स्वरुपात कचरा डेपो तयार केल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पसरलेोल्या दुर्गंधीमुळे परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जनहिताच्यादृष्टीने देवगड-जामसंडे शहरातील कचरा व्यवस्थापनात आपण स्वमालकीची जागा पुढील तीन महिन्यांच्या कालावधीकरिता तात्पुरत्या कचरा डेपोसाठी विनामूल्य वापरण्यास न. पं. प्रशासनाला परवानगी दिली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'ओमटेक असोसिएट च्या सहकार्यातून न. पं. इमारतीनजीक साठविण्यात आलेला कचरा हटवून तो परिसर भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांच्या माध्यमातून येत्या दोन-तीन दिवसांत स्वच्छ केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


देवगड येथील पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष योगेश चांदोरकर, न. पं. गटनेते शरद ठुकरुल. बाजूला योगेश पाटकर, अॅड. सौ. प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, रुचाली पाटकर, व्ही. सी. खडपकर आदी. वैभव केळकर


येथील आमदार नीतेश राणे संपर्क कार्यालयात शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चांदोस्कर बोलत होते. यावेळी न. पं. विरोधी गटनेते शरद ठुकरूल, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, भाजपचे देवगड-जामसंडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर, नगरसेविका अॅड. प्रणाली माने, तत्वी चांदोरकर, रुचाली पाटकर, स्वीकृत नगरसेवक व्ही. सी. खडपकर, भाजप युवामोर्चा देवगड-जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर


खवळे, बिजय कदम आदी उपस्थित होते. श्री. चांदोरकर म्हणाले, न. पं. सत्ताधाऱ्यांमुळे देवगड, जामसंडे शहरीकरणाची वाटचाल सध्या ग्रामीण स्थितीकडे जात आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना देवगड, जामसंडे शहरातील मतदारांनी मताधिक्य देऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ल्यातील न. पं. कार्यक्षेत्रातील शहरांमधून मिळालेले सर्वाधिक मताधिक्य हे देवगड, जामसंडे शहरातून आहे. आमदार नीतेश राणे यांच्या


नेतृत्वावर येथील जनतेचा विश्वास आहे. देवगड, जामसंडेमधील जी विकासकामे रखडली आहेत, ती पुढील सहा महिन्यांच्या काळात टप्याटप्याने केली जातील. आचारसंहिता संपल्यानंतर मंजूर विकासकामांचे कार्यारंभ आदेश दिले जातील. गेल्या अडीच वर्षांत देवगड, जामसंडे शहराच्चा अविकसित राहिलेला माग पूर्णतः विकसित करण्यासाठी भाजप नगरसेवकांकडून प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. कचरा डेपोच्या जागेसाठी भाजपचा पुढाकार आमदार राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मच्छी विक्री करणाऱ्या महिला भगिनींना पुढील सहा महिन्यांत सुसज्ज जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.


न. पं. गटनेते शरद ठुकरूल व नगरसेवकांच्या माध्यमातून कायमस्वरुपी कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध झाली असून त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही जागा न. पं. च्या ताब्यात आल्यानंतर तेथे कायमस्वरुपी कचरा डेपो करण्यात येईल. कचरा डेपोसाठी नवीन जागेचा ताबा मिळण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. मात्र, तोपर्यंत आपण स्वमालकीची जागा तात्पुरत्या कचरा डेपोसाठी विनामूल्य वापरण्याची परवानगी न. पं. प्रशासनाला दिली असल्याची माहिती चांदोस्कर यांनी दिली.


आम्ही कृतीतून काम दाखविणार : चांदोस्कर

देवगड, जामसंडे शहराच्या नळयोजनेसाठी सात कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून देवगडचा पाणीप्रश्न सोडविला जाईल.


न. पं. बर सत्ता मिळविणाऱ्या ठाकरे शिवसेनेकडे न. पं. वरील सत्ता टिकविण्याची पात्रता नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलने करणाऱ्या 'भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर केवळ टीका करण्याचे काम न. पं. सत्ताधारी नगरसेवकांनी केले. मात्र, त्यांना आता भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी कृतीतून उत्तर देणार आहेत. न. पं. इमारतीनजीक प्रशासनाने कचरा टाकण्यास सुरुवात केली, तेव्हा सत्ताधारी नगरसेवक झोपले होते का? प्रशासन अथवा न. पं. मुख्याधिकारी ऐकत नसतील, तर त्यांची तक्रार सत्ताधारी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे का केली नाही, असा सवाल चांदोस्कर यांनी उपस्थित केला.


न. पं. चे सत्ताधारी अपयशी : शरद ठुकरूल


न. पं. वर सत्ता चालविण्यास ठाकरे शिवसेनेचे सत्ताधारी नगरसेवक अपयशी ठरले असून सिद्धही झाले आहे. न. पं. इमारतीनजीकच शहरातील कचरा साठवून त्यांनी देवगडवासीयांची अवहेलना केली आहे. मात्र, हा कचरा तेथून हटविण्यासाठी भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे. 'ओमटेक असोसिएट'चे समीर पेडणेकर, सुशिल लोके, हेमंत देसाई यांच्या सहकार्यातून जेसीबी, डंपर आदी साधनसामुग्री उपलब्ध करून न पं. इमारतीनजीक साठविण्यात आलेला कचरा हटविण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत येथील जनतेने भाजपला पाठिंबा दिला असून शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे न. पं. गटनेते शरद ठुकरल यांनी सांगितले.