खोक्रलमध्ये देवेंद्र शेटकर यांना मिळतोय मोठा पाठिंबा

विजय आमचाच ; दीपक गवस यांना विश्वास
Edited by: संदीप देसाई
Published on: December 16, 2022 19:42 PM
views 258  views

दोडामार्ग : ना स्वतःसाठी, ना राजकारणासाठी आम्ही तळमळतोय गावाच्या विकासासाठी असा नारा देत पुन्हा एकदा थेट खोक्रल गावच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरलेले सरपंच पदाचे उमेदवार देवेंद्र रामकृष्ण शेटकर यांच्या प्रचाराला उस्फूर्त अप्रतिसाद मिळाल्याने या सार्वत्रिकीत श्री सिध्देश्वर ग्राम परिवर्तन पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास दीपक गवस यांनी व्यक्त केलाय. श्री सिध्देश्वर ग्राम परिवर्तन पॅनेल कडून सरपंच पदासाठी देवेंद्र शेटकर यासंह सदस्य पदासाठी प्रभाग दोन मधून साक्षी गवस, हेमा गवस, भरत गवस हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

  जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अगदी जवळचे माणूस म्हणून भाजपचे युवा कार्यकर्ते देवेंद्र शेटकर व स्वत दीपक गवस ओळखले जातात. आज राज्यात भाजप व शिंदे यांचं सरकार आहे. शिवाय जिल्हयाचे पालकमंत्री भाजपचे रवींद्र चव्हाण आहेत त्यामुळे याचा फायदा निछितच खोक्रल गावच्या महत्वपूर्ण ठरणार आहे. सरपंच म्हणून गेल्या पाच वर्षात कोरोंना सारखी मोठी आपत्ती येऊनही केलेलं काम लोकांना माहीत आहे. आणि हे काम करत असताना खोक्रल गावच्या नेमक्या समस्या, आवश्यक कामे, आणि प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान घेता आले. म्हणूनच पुन्हा एकदा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सरपंच पदासाठी निवडनुक रिंगणात उतरलो आहे. आणि मतदारांनी सुद्धा आपल्याला मोठा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा उसप गावाचे विकासाचे निच्छित व्हीजन आम्ही ठेवलं असून गावचा त्या माध्यमातून विकास करणार असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार देवेंद्र शेटकर यांनी म्हटले आहे. 

सरपंच असताना गावात अनेक उपक्रम, अभियान, शाळकरी गुणवंत मुले, महिला, जेष्ठ नागरिक यांचा सन्मान करण्यात आला. सर्व सहकार्यांपनी दिलेल्या खंबीर साथीमुळे गावात जवळपास ५० हून अधिक विकास कामे विविध योजनांतून मार्गी लावण्यात आली. लोकसहभागातून सुद्धा अनेक कामे पूर्ण करण्यात आली. तर महिला बचत गटांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण,  महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम , स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिन, पिठाची गिरण, मुलींना सायकल यांचा लाभ मिळवून दिलेला आहे., गावाच्या विकासात हातभार लावलेल्या महिलांचा सत्कार., स्वतंत्र दिनानिमित महिलांना ध्वजारोहणाचा मान देण्यासाठी आमच्या ग्रामपंचायत ने घेतलेला पुढाकार सर्वश्रूत आहे. यापुढे गावातील गोवा मंडळ, मुंबई मंडळ, ग्रामस्थ चाकरमानी, तरुण यांना एकत्र घेऊन सरपंच रिलीफ फंड स्थापन करून जमा झालेल्या या राशीचा उपयोग गावातील गरजू, आजारी व वृध्द ग्रामस्थांसाठी करण्याचा संकल्प शेटकर व त्यांच्या टीमने ठेवला आहे ., स्वच्छ व पारदर्शक कारभार,  खोक्रल गावात डिजिटल क्रांती करणे., महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी गावात लघुउद्योग सुरु करणे., तिराळी प्रकल्पाचे पाणी खोक्रल गावात तसेच खोक्रल पंचक्रोशीत आणण्याचा प्रयत्न. पर्यटन दृष्ट्या खोक्रल गावाला विकसित करणे, गावातील सर्व विकास मंडळ व ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामविकास समिती स्थापन करणे,  गावातील सर्व पाळंद रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा निर्धार, गावातील सर्व वाडीवर नळ योजना प्रभावीपणे राबविणे व खोक्रल गावासाठी सुसज्ज ग्रामसचिवालय बांधणे हा मोठा अजेंठा त्यांनी मतदारांसमोर ठेवला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून एक उमद, अभ्यासू आणि राजकरणात आणि समाजकारणात स्वतच वलय निर्माण करणार सक्षम व्यक्तीमत्व गावचा सरपंच बनावा व जिल्ह्यातून विकास निधीच्या माध्यमातून खोक्रल गावच्या विकासासाठी  निवडणुकीत नागरिक व गावकरी मतदार देवेंद्र शेट्कर यांनाच पाठिंबा देत असल्याचे दीपक गवस यांनी म्हटले आहे.