देवेंद्र फडणवीस यांची उद्या राजापूरात तोफ धडाडणार..!

Edited by: भरत केसरकर
Published on: April 25, 2024 14:23 PM
views 80  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.उद्या देवेंद्र फडणवीस हे या मतदारसंघातील राजापूर येथील राजीव गांधी मैदानावर सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.दुपारी बारा वाजता राजापूर येथे देवेंद्र फडणवीस यांची उद्या शुक्रवारी सभा होत आहे.या सभेसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे.

नारायण राणे यांना राजापूर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे.