
दोडामार्ग : कोकणातील माणसे एकत्र येऊन स्वतःला आवश्यक असलेला कोकण संस्कृतीतील विकासाबाबत मराठा महासंघाने आयोजित केलेल्या मेळाव्यात विचार मंथन करतात हे दोडामार्ग तालुक्यात आगामी विकासाचे व्हिजन असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनचे माजी सल्लागार डॉ. सतिश कारंडे यांनी महाराजा हॉल दोडामार्ग येथे आयोजित अॅडव्हांटेज दोडामार्ग मेळाव्यात प्रतिपादन केले.
आपण आपल्या बालपणी असलेल्या आपल्या गावाकडचा आजूबाजूचा परिसर पहा, आजूबाजूला असलेल्या त्यावेळची झाडेझुडपे आठवा. त्यावेळी असलेल्या नदी, नाले यांची आठवण करा आणि सद्यस्थितीत असलेला परिसर, सद्यस्थितीत असलेले आपली गावे पहा. पूर्वी असलेल्या आपल्या आजूबाजूचा परिसर हा सद्यस्थितीत नाही आहे माणूस सद्यस्थितीत विकासाच्या नावाने फेरबदल करत आहे. निसर्ग संपन्न असलेला आपला कोकण येथील घरे तथा आजूबाजूचा परिसर हा सद्यस्थितीत बदलत असून त्यामुळे उष्णतेचे प्रमाण, आपली जीवनशैली बदलली असल्याकारणाने अनेक समस्या वाढत आहे. आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे निसर्गाशी असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपण जीवनशैली जगूया असे मार्गदर्शन केले. मातीचे घरे आधुनिक पद्धतीने बांधता येतात ती पाच पिढ्या टिकतात. कोकण पद्धतीने असलेली घरे पाहण्यासाठी, त्यात राहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. स्थानिक घरे ही कोकण पद्धतीत असतील तर व्यावसाय करु शकता. त्यांना स्थानिक जेवण दिले पाहिजे. आपल्या भागातील पिकणारे जेवण द्यायला हवे. तर पर्यटकांची संख्या वाढणार आहे असे मार्गदर्शन आर्किटेक श्रीमती तलुल्ला डिसिल्वा यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेणार नाही आहेत आता हे कार्य आपल्या मावळ्यांनाच करावे लागणार आहे. बाहेरील आक्रमण थांबवण्यासाठी स्थानिकांना पुढाकार घेऊन उद्योग, व्यवसायात, रोजगारात उतरावे लागेल. स्थानिक असलेल्या फळे, फुले, वनस्पती यांचा आधार घेऊन बदलत्या शैलीत येथील स्थानिक नैसर्गिक साधनांचा वापर करून त्याचा उद्योग, व्यवसायात वापर करायचा आहे. स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत मागणी आहे. गोवा हे अगदी जवळ असलेलं दोडामार्ग तालुक्याला मार्केट आहे. त्याचा सुयोग्य वापर येथील युवकांनी करावा. काजू व बोंडू नुसते विकण्यापेक्षा त्यापासून अनेक उत्पादने येथील युवकांनी घ्यावीत त्यासाठी आम्ही आपणास मार्गदर्शन करू असा विश्वास सामंतक संचालक सचिन देसाई यांनी दिला.
अँडव्हानटेज दोडामार्ग कार्यक्रमात व्यासपीठावर महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनचे माजी सल्लागार डॉ.सतीश कारंडे, पर्यावरण कायदे विषयक तज्ञ एडवोकेट उमा सावंत, आर्किटेक विषय- जुनी बांधकाम विषयी श्रीमती तलुल्ला डिसिल्वा, पर्यावरण तज्ञ डॉ.राजेंद्र केरकर, संचालक कोतबँक विषय - बांबू- मोहन होडावडेकर, संचालक सामंतक संस्था विषय - काजू व बांबू प्रक्रिया सचिन देसाई, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उद्योजक मेघश्याम राऊत, जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्ष सोनु गवस यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी दोडामार्ग मराठा समाज तालुकाध्यक्ष उदय पास्ते, उपाध्यक्ष दिवाकर गवस, सचिव-भूषण सावंत, खजिनदार- संदीप गाडी, सहसचिव सुशांत गवस, सहखजिनदार - गोपाळ माजीक, सदस्य प्रसाद रेडकर, मराठा व्यापारी संघटना अध्यक्ष सुदेश मुळीक, मराठा व्यापारी सचिव- प्रदीप गावडे, वैभव इनामदार, पुनाजी गवस, विठ्ठल दळवी, नगरसेवक चंदन गावकर, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर, सुर्यकांत गवस, राजेंद्र निंबाळकर, प्रकाश गवस, डॉ.रामदास रेडकर, डॉ.उमेश देसाई, दयानंद धाऊसकर, संजय सावंत, आदी मराठा बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी तर आभारप्रदर्शन मराठा महासंघ सचिव भूषण सावंत यांनी व्यक्त केले.