
मालवण : गेल्या २० वर्षात पत्रकारिता बदलत गेली आहे. समाजाचा आरसा बनून पत्रकार काम करत असल्यामुळेच समाज प्रबोधन घडत असते. भविष्यातील गोष्टींचा वेध घेऊन पत्रकारिता झाल्यास समाजाचा विकास दूर नाही. २१ वे शतक म्हणजे काय हे फक्त पत्रकारच दाखवू शकतात, असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले.
मालवण तालुका पत्रकार समितीचा सन २०२२ चा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारंभाचा शुभारंभ झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी खासदार तथा दैनिक प्रहारचे संचालक निलेश राणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, प्राचार्य एस. ए. ठाकूर, साहित्यिका मेघना जोशी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, सदस्य महेश सरनाईक, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी संतोष गावडे यांनी प्रास्ताविक करत मालवण तालुका पत्रकार समितीच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मालवण पत्रकार समितीतर्फे निलेश राणे, उमेश तोरसकर, मेघना जोशी, प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संतोष गावडे यांचा, मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मालवण पत्रकार समितीचे सचिव कृष्णा ढोलम यांचा, चौके ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल पी. के. चौकेकर यांचा, ब्रेकिंग मालवणीचा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रफुल्ल देसाई यांचा, सिंधुदुर्ग कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल ओंकार यादव यांचा यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अमित खोत यांना, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार परेश सावंत यांना तर मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत बेस्ट स्टोरी अवार्ड पुरस्कार संदीप बोडवे यांना निलेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, घडलेल्या घटनांवर आधारित बातम्या, संशोधनपर बातम्या, आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींवर आधारित बातम्या असे पत्रकारितेचे तीन प्रकार पडतात. आज संशोधनपर पत्रकारिता कमी दिसत असून पत्रकारांनी एखाद्या बातमीचा पाठलाग केला पाहिजे. मालवण तालुक्यातील पत्रकारांमध्ये कोणतेही गट दिसत नाहीत, मालवण पत्रकार संघासाठी आपले नेहमीच सहकार्य असून या पत्रकार संघाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू, असेही निलेश राणे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले, सन्मानपत्र वाचन सौगंधराज बादेकर, प्रफुल्ल देसाई व अमित खोत यांनी केले. तर आभार समिती उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले. या सोहळ्यास तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, राजा गावकर, विश्वास गावकर, महेश राणे, किसन मांजरेकर, बाबा मोंडकर, अवि सामंत, बाळू नाटेकर, ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे, उमेश सांगोडकर, अरविंद मोंडकर, दादा वेंगुर्लेकर, के. पी. चव्हाण, संतोष लुडबे, पूजा सरकारे, नमिता गावकर, शिल्पा खोत, सिया धुरी, नीलिमा सावंत, नूतन वराडकर, छाया कदम, शुभांगी लोकरे- खोत, सौ. बोडवे, हनुमंत प्रभू, दीपक सुर्वे, महेश गावकर, पांडुरंग वायंगणकर, अशोक पाडावे, संतोष मिराशी, अरविंद सावंत, जेरॉन फर्नांडिस, जयप्रकाश परुळेकर, किशोर त्रिंबककर, अवधूत हळदणकर, ऋषी मेस्त्री, गोट्या तावडे, पत्रकार कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, सिद्धेश आचरेकर, महेश कदम, महेंद्र पराडकर, सुरेश ठाकूर, आपा मालंडकर, अमोल गावडे, नितीन गावडे, अनिल तोंडवळकर, संतोष हिवाळेकर, संग्राम कासले, भूषण मेतर, विशाल वाईरकर, अर्जुन बापर्डेकर, उदय बापर्डेकर, समीर म्हाडगुत, सुरेश घाडीगांवकर, नितीन आचरेकर, सुधीर पडेलकर, भाऊ भोगले, गणेश गावकर, जुबेर खान आदी व इतर उपस्थित होते.