कलंबिस्त गावचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकास

नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते रस्ता कामाचं भूमीपूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2022 18:24 PM
views 189  views

सावंतवाडी : कलंबिस्त गावाचा विकासासाठी स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झाला आहे. या भागात रस्ते पूल आदी विविध कामांसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यापुढेही या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निधीसह शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे केली जातील, असे बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी स्पष्ट केले. कलंबीस्त गण शेळवाडी मुख्य रस्ता ते कदमवाडी या भागाकडे जाणारा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी श्री राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2021 22 अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर आमदार निधीतून मंजूर झाले आहे. या रस्त्याचे भूमिपून  बाळासाहेबांचे शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे व माजी शिक्षण विस्तार अधिकारी विश्राम कलंबिस्तकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गजानन नाटेकर, दत्ता सावंत, संजय पालकर, संदेश बिडये, नूतन ग्रामपंचायत सदस्य दर्शना बिडये, हनुमान पास्ते हर्षदा कदम, दत्ताराम कदम, वसंत कदम, अशोक रावूल, बाबा पास्ते, शाहू पास्ते ,  सुरेश पास्ते , दाजी बिडये , बाळा बीडये, अजित बिडये, पांडुरंग सावंत , उदय सावंत,   प्राजक्ता कदम ,सुगंधा कदम , नूतन कलंबिस्टकर, विखाशा कदम, श्रद्धा कदम, अमित कदम , समीर कदम , सदा कदम , सुमन कदम, शाम कलंबिसकर,अजित कदम , इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे अशी ग्रामस्थ अपेक्षा व्यक्त केली.