
सावंतवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना प्रभाग क्रमांक १ मधील विकास कामांचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आदि उपस्थित होते.
यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, गटार बांधणे, संरक्षण भिंत बांधणे, रस्त्याचे रुंदीकरण करणे, प्री कॉस्ट फरश्या बसविणे आदी कामांचा समावेश आहे.