'विकसित भारत संकल्प यात्रा' कणकवलीत !

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 29, 2023 15:49 PM
views 276  views

कणकवली : भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” या नावाची देशव्यापी मोहिम 15 नोव्हेंबर ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम आखण्यात आली आहे. आज शुक्रवार रोजी कणकवली शहरात कै. आप्पासाहेब पटवर्धन चौक  येथे  विकसित भारत संकल्प या रथ यात्रेचे सकाळी आगमन झाले. यावेळी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसिलदार  दिक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी नगरपंचायत  परितोष कंकाळ यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून “विकसित भारत संकल्प यात्रा” या रथाचे स्वागत करण्यात आले. 


यावेळी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष  समिर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, युनियन बॅक व्यवस्थापक  गौरव अग्रवाल,बॅक ऑफ इंडिया ऋण अधिकारी  प्रफुल्ल वाडीभसमे, युको बॅक व्यवस्थापक शशिकांत उके  व विविध कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी, कणकवली नगरपंचायतीचे सर्व अधिकारी,कर्मचारी व  मोठ्या संख्येने कणकवली शहरातील नागरिक,लाभार्थी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या पी.एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, आयुष्यमान भारत  कार्ड शिबिर, मुद्रा लोन योजना, आधारकार्ड अद्यावत करणे, खादी ग्रामोद्योग मंडळ योजना, स्वच्छ भारत मिशन यासारख्या विविध योजनेची माहिती व लाभ देणारे स्टॉल येथे उभारण्यात आले होते.  तसेच उपजिल्हा रूग्णालय कणकवलीच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी नागारिकांनी  मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.  या मोहिमेतंर्गत विविध योजनांबद्दल जागरूकता निर्माण करून सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून या मोहिमेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. योजनेची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. प्रशासक जगदीश कातकर यांनी उपस्थित नागरिकांना जास्तीत जास्त शासकिय योजनांचा लाभ घ्यावा  असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा.प्रकल्प अधिकारी अमोल भोगले व आभार प्रशासकिय अधिकारी अमोल अघम यांनी मानले.