नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली

माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते शुभारंभ
Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 05, 2026 13:42 PM
views 135  views

देवगड : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या  75 व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजप च्या वतीने आयोजित सायकल रॅलीचे माजी आमदार ॲड अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले

तसंच जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, व तालुका अध्यक्ष राजा भुजबळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या 75 व्या वाढदिवसा चे औचित्य साधून   देवगड मंडल भाजप च्या वतीने 5 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता इको व्हीलर ग्रुप देवगड सायकल रॅली (देवगड सायकलोथॉन ) चे आयोजन करण्यात आले होते.

ही सायकल रॅली शालेय गट बारा वर्षे पर्यंत व खुला गट या दोन गटात असून शालेय गटांकरिता अकरा किलोमीटरचे अंतर व खुल्या गटा करता 25 किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले होते. शालेय गटा करीता जामसंडे भाजप कार्यालय ते मिठमुंबरी पूल ते जामसंडे भाजप कार्यालय तर खुल्या गटाकरिता जामसंडे भाजप कार्यालय ते कातवण पेट्रोल पंप ते जामसंडे भाजप कार्यालय असा मार्ग निश्चित केला होता. या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या व सायकल रॅली पूर्ण करणाऱ्या सायकल स्वार यांना मोफत टी-शर्ट मेडल आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.

यावेळी बाळ खडपे, भाजप सर चिटणीस योगेश चांदोस्कर महेश जंगले युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील नगरसेवक शरद ठुकरूल, रोहन खेडेकर, ऍड अभिषेक गोगटे अल्पसंख्याक अध्यक्ष सर्फराज शेख, माजी नगरसेवक उमेश कणेरकर बापू जुवाटकर,रविंद्र कोयंडे, विश्वामित्र खडपकर संजय तारकर, विजय वाळके ज्ञानेश्वर खवळे वा अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.