पाटगाव ग्रामपंचायतीत ‘जल महोत्सव’ विविध उपक्रमांनी साजरा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 21, 2026 15:03 PM
views 39  views

देवगड :  ग्रामपंचायत पाटगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत ८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘जल महोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीरीत्या संपन्न झाला. जलसंवर्धन, पाणी बचत आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर व सरपंच  नितेश सहदेव गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पाण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पंचायत समिती देवगड सादिक डोंगरकर म्हणाले कि पाणी हे जीवन असुन पाणी गुणवत्ता व जलसंवर्धनासाठी अशा उपक्रमांत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले . तसेच या उपक्रमामुळे गावात पाण्याबाबत सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.

महोत्सवात जलदिंडी काढून जलसंवर्धनाचे संदेश गावभर पोहोचविण्यात आले. ‘जलदिंडी’च्या माध्यमातून महीलांनी आणि ग्रामस्थांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘जल बंधन’ उपक्रमातून पाणी जपण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. पाणी गुणवत्ता प्रात्यक्षिकाद्वारे सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याची चाचणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ‘जल संकल्प शपथ’ घेऊन नागरिकांनी पाणी वाचविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ‘हर घर जल’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. हे नियोजन विस्तार अधिकारी ( ग्रा.प )दिपक तेंडुलकर व शाखा अभियंता  संदीप पोवार यांनी जल व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गावात शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी रुमा फड मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच शालेय समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्यक्रमात उपसरपंच संदीप गुरव, माजी सरपंच दिपक गुरव, श्रद्धा गुरव, पोलीस पाटील रविकांत गुरव, ग्रा. प सदस्य व शिक्षण समिती अध्यक्ष जितेंद्र सावंत , तंटामुक्ती अध्यक्ष सुहास गुरव, तसेच ग्रामस्थ एकनाथ बाणे , सखाराम बाणे , प्रदिप गुरव , ग्रा.प सदस्य प्रकाश गुरव, अर्चना गुरव,विजया हातगे, सानिका गुरव, सुलोचना ईळकर,तसेच ग्रा.प सदस्य , ग्रा.प कर्मचारी सुधाकर गुरव, अविनाश मोरे, सीआरपी पूजा हातगे शिक्षकवृंद , विदयार्थी , आशा सेविका , अंगणवाडी सेविका व मोठया संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

      या महोत्सवात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला त्यामुळे घरगुती पातळीवर पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित केले .