वस्तू निवडीचा अधिकार व हक्क ग्राहक चळवळीमुळे : तहसीलदार रमेश पवार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 17, 2026 15:06 PM
views 56  views

देवगड : ग्राहकाने जागरूक राहून वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे तसेच“जागो ग्राहक जागो “हा संदेश जनजागृती द्वारे घराघरात पोहोचवावा असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी जागतिक ग्राहक दिना निमित्त देवगड तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.या ग्राहक दिन कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावरअध्यक्षस्थानीतहसीलदार रमेश पवार, पुरवठा निरीक्षक अधिकारी संग्राम गुट्टे,पुरवठा निरीक्षक सुनील बेबले, उपअधीक्षक भूमी अभिलेख अमोल क्षीरसागर, नायब तहसीलदार छाया आखाडे, संतोष खरात, गोदाम रक्षक श्री. कसालकर, सहायक महसूल अधिकारी संदीप हांगे,पंचायत समिती अधिक्षक संतोष बिर्जे,ग्राहक पंचायत देवगड शाखा अध्यक्ष नारायण माने ग्राहक पंचायत प्रसिद्धी प्रमुख दयानंद मांगले,विजय कदम आनंद देवगडकर,मोहन पाटील, , पूजा जाधव, श्रीम.गीता लळीत, दीपिका मेस्त्री, लक्ष्मण पाताडे आदी उपस्थित होते.

पुढे तहसीलदार रमेश पवार बोलताना म्हणाले आपल्या दैनंदिन जीवनात कोणती वस्तू खरेदी करत असताना प्रत्येक ग्राहकाने जागरूक राहून वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे.ग्राहकांना वस्तूंबाबतची सुरक्षितता त्याविषयी माहिती व वस्तू निवडीचा अधिकार व हक्क हा ग्राहक चळवळीमुळे मिळाला असून ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकाने जागरूकता पाळावी 

प्रास्ताविक संदीप हांगे यांनी करून ग्राहक आणि विक्रेता हा महत्त्वाचा दुवा असून यामध्ये समनव्य असणे आवश्यक आहे त्याचबरोबर प्रामाणिकपणा ही महत्त्वाचा आहे यासाठी जनजागृती गरजेची आहे. ग्राहक पंचायतीमार्फत ही चळवळ सुरू झाली असून याचा प्रसार व प्रचार हा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे असे सांगून ग्राहक चळवळीची उगम व इतिहास याची माहिती दिली. या निमित्ताने दयानंद वांगले यांनी मार्गदर्शन करताना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ग्राहकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचणारा व न्याय देणारा विभाग हा महसूल शाखेचा पुरवठा विभाग असून देवगड तालुका पुरवठा विभाग निश्चितपणे रास्त दराच्या धान्य दुकान सेवेबाबत अथवा सद्यस्थितीत आखाती युद्धाचा परिणाम होऊन देखील तालुक्यातील पेट्रोल, डिझेल वितरण त्याचप्रमाणे घरगुती गॅस वितरण याबाबत पुरवठा शाखेने जागरूकता दाखवत येथील नागरिकांना अपेक्षित सोयी सुविधा दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या. विजय कदम यांनी देखील ग्राहक चळवळीचे महत्त्व वीज वितरण कंपनी ऊर्जा मित्र बैठकीतील ग्राहकाला मिळालेला न्याय उदाहरणासहित पटवून दिले. भूमी अभिलेख खात्याचे उपअधिक्षक अमोल क्षीरसागर यांनी समाजातील प्रत्येक ग्राहकाने वस्तू खरेदी करीत असताना जागरूकता दाखवून त्यावरील एमआरपी रक्कम,, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चर एक्सपायर तारीख याकडे प्रकर्षाने लक्ष देणे आवश्यक असून प्रत्येक ग्राहकाने वस्तू खरेदी करताना योग्य ती दक्षता बाळगणे गरजेचे आहे..आणि यासाठी ठीक ठिकाणी मुख्य बाजारपेठ अथवा आठवडा बाजार महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीचे “जागो ग्राहक जागो “असे फलक लावावेत अशी सूचनाही ग्राहक पंचायत देवगड शाखेला केली

ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष नारायण माने यांनी ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा काळा असून तो लोकशाहीतील महत्त्वाचा पाया आहे त्यामुळे ग्राहकाने आपली फसवणूक होऊ नये यासाठी जागरूक राहणे महत्त्वाचे आहे असे आवर्जून सांगितले या निमित्ताने ग्राहक पंचायतीचे प्रसिद्धी प्रमुख दयानंद मागले यांनी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांच्या देवगड तहसीलदार रमेश पवार व भूमी अभिलेख उपअधीक्षक अमोल क्षीरसागर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी महसूल प्रशासनाचे अधिकारी ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहा महसूल अधिकारी प्रदीप कदम आभार संदीप हांगे यांनी मानले.