
सावंतवाडी : अनेक वर्षापासून चालत आलेला तळवणे गावातील देव दीपावलीचा कार्यक्रम दशक्रोशीत प्रसिद्ध आहे. या देव दीपावलीला देवांची लग्न लावली जातात. हे क्षण बघण्यासाठी अनेक भाविक आवर्जून उपस्थित असतात. उद्या हा सोहळा संपन्न होणार आहे.
हे एक ब्राह्मणी स्थळ आहे. तेथील झाडाची पाने सोन म्हणून समजलं जातं. खूप आनंदाने सर्व भाविक सोन लुटतात. हा एक आगळा वेगळा सोहळा असतो. हे लुटलेलं सोन गावातील प्रमुख देवता श्री देवी माऊली मंदिरात देवीच्या चरणी अर्पण केल जात. सर्वात शेवटी अमृत फळ ठेवून सांगणं बोलणं झाल्यानंतर देवाचा कौल घेतला जातो व त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होते. पूर्वानपार चालत आलेल्या रितिरिवाजा प्रमाणे हा सण साजरा केला जातो.