
कुडाळ : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांना मोठ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी रमेश किर यांना मोठया मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, संदेश पारकर, संजय पडते,इर्शाद शेख, अमित सामंत, अर्चना घारे,प्रसाद रेगे,विवेक ताम्हाणेकर,अभय शिरसाट, राजन नाईक, संतोष शिरसाट, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, किरण शिंदे, उदय मांजरेकर, अनंत पिळणकर,सचिन काळप अमित राणे, गुरु गडकर आदी उपस्थित होते.