
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याला व्यसनांचा विळखा पडला आहे. तरुण पिढी व्यसनांच्या आहारी गेली आहे. व्यसनाधिन व्यक्तींमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे अन् उद्ध्वस्त होण्याचा मार्गावर आहे. गावागावांत अमलीपदार्थ विक्रीचे जाळे विस्तारले आहे. ग्रामीण भागातील युवा पिढीही अमलीपदार्थांचे सेवन करीत आहेत. अमलीपदार्थ विक्रीचे जिल्ह्यात विस्तारलेले जाळे सिंधुदुर्ग पोलिसांनी उद्ध्वस्त करून हा जिल्हा व्यसनमुक्ती बनवावा, असे कळकळीची विनवणी डॉक्टर, पोलीस पाटील, सुजान नागरिकांनी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्याकडे केली.
अमलीपदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे येथील मातोश्री मंगल कार्यालयात ‘नशा छोडो, जीवन जोडो’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, कणकवली विभागीय पोलीस अधिकारी घन:श्याम आढाव, सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाताडे, डॉ. सुहास पावसकर, डॉ. विद्याधर तायशेटे, प्रफुल्ल आंबेरकर, डॉ. शमिला बिरमोळे, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. संदीप साळुंखे, डॉ. प्रमिला नाटेकर, डॉ. स्वप्नील राणे, ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण, पोलीस मंगेश बावदाणे, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे अमलीपदार्थ विरोधी अभियान जिल्ह्यात राबवले जात आहे. पोलीस दलाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्त करण्याचा विडा उचला आहे. त्यांच्या या कार्याला जिल्ह्यातील डॉक्टरांचे सहकार्य करणार आहे. जिल्ह्यात अवैध धंद्यांची व्यवस्थ तयार झाली आहे, तिचा बीमोड पोलिसांनी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढीला सहजपणे अमलीपदार्थ सेवन करण्यासाठी उपलब्ध होत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. अमलीपदार्थ सेवन करणाºया तरुण -तरुणींचा मेंदूवर विपरित परिणाम झाला आहे. त्यांना या अवस्थेतून बाहेर काढताना कुटुंबीय व डॉक्टरांना बाहेर काढताना खूप दक्षता घ्यावी लागत आहे. अमलीपदार्थांच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी समुपदेशकांची गरज आहे. याकरिता पोलिसांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात एक समुपदेशन केंद्र सुरू करावी, अशी मागणी डॉ. प्रमिला नाटेकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू मद्यपींना सहजरित्या उपलब्ध होत आहे. दारुच्या आहारी
शालेय विद्यार्थी गेले आहेत. आता तर चरस व गांजा सारख्या अमलीपदार्थ सेवनकरण्यासाठी सहजरित्या उपलब्ध होत आहे. त्यांना अमलीपदार्थ उपलब्ध करून देणाड्ढया रॅकेटचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करावे, अशी मागणी डॉ. सुहास पावसकर यांनी केली. अमलीपदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा डॉ.संदीप साळुंखे यांनी व्यक्त केली. दारु विक्रेत्यांनी कमी वयाच्या मुलांचा दारू देऊ, नये अशी सूचना त्यांना जिल्हा पोलीस दलाने करावी, अशी अपेक्षा भाई चव्हाण यांनी व्यक्त केली. राजेश पाताडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्त होण्यासाठी पोलिसांना सहकार्य करू, असे आश्वासन प्रफुल्ल आंबेरकर, राजेश पाताडे यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय हरकुळकर यांनी केले. या कार्यक्रमाला पोलीस पाटील, डॉक्टर, सुजान नागरिक, पोलीस उपस्थित होते.
पोलीस हा समाजाचा घटक आहे. कायदा व सुवस्था राखणे हे त्याचे कर्तव्य आहे. सिंधुदुगार्तील पोलीस हे कर्तव्य बजावत असतानाच ज्येष्ठांना मदतीचा आधार देण्याचे काम करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्त करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. अमलीपदार्थांचे विक्री रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. या रॅकेटचा बीमोड करण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक