
सावंतवाडी : छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची असलेली कबर मुळासकट उखडून टाकण्यासाठी सावंतवाडी येथील हिंदू बांधव, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या माध्यमातून राज्य सरकारला संविधानिक पद्धतीने निवेदन देण्यात आले. तहसीलदार कार्यालयात संबंधित निवेदन अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील भारतीयांचा छळ करणारा, क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर मुळासकट उकडून टाकण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सावंतवाडी तहसील कार्यालयात याबाबतच निवेदन देण्यात आले. भविष्यात छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर उखडून न टाकल्यास येणाऱ्या काळात गावागावातून समस्त हिंदू बांधव जमवून ही कबर उखडून टाकण्यासाठी कारसेवा करतील असा इशारा देण्यात आला.
यावेळी विनायक रांगणेकर, स्वागत नाटेकर, दिनेश गावडे, किशोर चिटणीस, कृष्णा धुळपनावर, चिन्मय रानडे, दिनेश गावडे, साईराज नार्वेकर, सुनील सावंत, सौ रेवती लेले, सौ. रांगणेकर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.