उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात

Edited by:
Published on: May 10, 2025 17:29 PM
views 92  views

सिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 मे 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11.45, वाजता चिपी विमानतळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व मोटारीने किल्ले राजकोटकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभास उपस्थिती (स्थळ :- किल्ले राजकोट, ता. मालवण), दुपारी 1 वाजता, मोटारीने टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवणकडे प्रयाण, दुपारी 1.15 वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व हेलिकॉप्टरने गोशाळा हेलिपॅड, कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता, गोशाळा हेलिपॅड, कणकवली येथे आगमन व मोटारीने करंजे-सामटवाडी, ता. कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 1.40 वाजता, गोवर्धन गोशाळा कोकण उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, (स्थळ :- करंजे-सामटवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) दुपारी 2.30 वाजता, मोटारीने गोशाळा हेलिपॅड, कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 2.45 वाजता, गोशाळा हेलिपॅड, कणकवली येथे आगमन व हेलिकॉप्टरने चिपी विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 3.15 वाजता, चिपी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण