झुलत्या पूल परिसरात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ट्राफिक पोलिसांची नेमणूक करा

वेंगुर्ला शिवसेनेची पोलीस व नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी
Edited by: दिपेश परब
Published on: May 17, 2023 19:58 PM
views 113  views

वेंगुर्ला : 

शहरातील पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या झुलता पूल परिसरात वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी पोलिसांची नेमणूक करण्याबाबत वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने  वेंगुर्ले पोलिस ठाणे व नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. 

    सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. वेंगुर्ले तालुक्याच्या पर्यटनात विशेष भर टाकणारा प्रकल्प म्हणजेच  शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मांडवी खाडी व अरबी समुद्राच्या संगमावर उभारण्यात आलेले झुलते पूल. अत्यंत मनमोहक असे पूल सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे अनेक छायाचित्रकार येथे छायाचित्रणासाठी व व्हिडीओ चित्रीकरणासाठी पहिली पसंती दर्शवतात. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून याठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत. 


मात्र सायंकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा पर्यटकांसाहित स्थानिक नागरिकानंही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेने पोलीस विभागाच्या मदतीने याठिकाणी वाहतुकीचे नियोजन करावे. तसेच पोलीस विभागाच्या वतीने येथे वाहतूककोंडी होत  असलेल्या वेळेत वाहतूक पोलीस गर्दीच्या नियोजनासाठी तैनात करावेत. त्यामुळे पर्यटन ठिकाणी गर्दी ही नियंत्रित होईल व पर्यटनाचा आनंदही पर्यटकाना घेता येईल त्याकरिता वेगुर्ला नगरपरिषद व वेंगुर्ले पोलीस यांनी नियोजन करावे अशी मागणी वेंगुर्ला शिवसेना शहराच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, श्रद्धा बाविस्कर-परब , युवक शहर प्रमुख संतोष परब, प्रवक्ते सुशील चमणकर, शाखा प्रमुख प्रभाकर पडते, तुळस विभाग प्रमुख संजय परब, सुनील तुळसकर, महेश परब आदी उपस्थित होते.