रामपूरात CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू लागवडीचे प्रात्यक्षिक

Edited by: मनोज पवार
Published on: June 25, 2025 13:06 PM
views 819  views

चिपळूण :  डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय येथील जय किसान ग्रुपच्या कृषीदुतांनी, नुसतेच रामपूर येथे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून  CRA (क्लायमेट रिसायलेंट एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी) या फळपीक लागवड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक  शेतकरी पांडुरंग कातकर यांच्या शेतात दाखवले.

यावेळी कृषिदूतांनी व कृषी अधिकाऱ्यांनी CRA तंत्रज्ञानाचे महत्त्व उपस्थित शेतकऱ्यांना पटवून देत असताना सांगितले की CRA (हवामान प्रतिरोधक शेती )या तंत्रात पाण्याचा कमी वापर करून उत्पादन सुधारले जाते. यामध्ये विशिष्ट परिमाणासह खड्डे खोदणे, पाणी आणि पोषक तत्वांचे शोषण सुलभ करण्यासाठी वाळू आणि कंपोस्टने भरलेले PVC पाईप ठेवणे धोरणात्मक आहे.

यावेळी, उपकृषी अधिकारी श्री. डी. के. काळे,मंडळ कृषी अधिकारी श्री. दत्तात्रय आवारे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अमित मोटे व कृषिदूत तेजस चोथे,वैभव पवळ, प्रतीक माळी, ओंकार भापकर, उदयनराजे भोसले, तुषार भाबड,मंगेश पिसे, अमित माळी, पुरुषोत्तम माळी, विराज कणसे, भारतकुमार बिराजदार उपस्थित होते.