
सावंतवाडी : युतीचा धर्म १०० टक्के पाळला जाईल, काही लोक नितेश राणे यांच्या मतदारसंघात त्यांना त्रास देण्याच काम करत आहेत. त्यांना बदलण्याची मागणी करणार पत्र मी आमच्या पक्षाला दिलं आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले, युतीचा धर्म हा पाळलाच पाहिजे. माझ्याशी कोण कसं वागत हे बघत नाही. माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. प्रवक्ता म्हणून मी कार्यरत आहे. असं असताना माझ्या जिल्ह्यात युती धर्म हा पाळला गेला पाहिजे. त्यामुळे काही बदल मी सुचविलेले आहेत. इतर कोण असं करत असतली तर त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्या पक्षाने ठरवावं असही मंत्री केसरकर म्हणाले.