धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Edited by:
Published on: November 04, 2023 20:09 PM
views 302  views

देवगड : द्वेषपूर्ण वक्तव्ये करून हिंदू धार्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तामिळनाडूचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन, महाराष्ट्रातील आमदार जितेंद्र आव्हाड व पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अशी तक्रार आज देवगडतालुक्यातील हिंदू धर्मप्रेमी नागरिकांकडून मालवण पोलीस पोलीस ठाण्यात करण्यात आली. सुधीर कदम पोलीस उपनिरीक्षक देवगड यांच्याकडे ही तक्रार सादर करण्यात आली.