
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता तसेच परिसराची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या कार्यकारणीने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी आज पालिकाच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांच्याजवळ दिले. यावेळी महासंघाचे तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा जन्मोत्सव 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण थाटामाटात साजरा होणार आहे. शहरातील शिवप्रेमींकडून पालिका प्रशासनाच्या हद्दीतील शिवा पुतळ्यांकडे शिवजयंती साजरी केली जाणार आहे. सद्यस्थितीत पुतळ्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून परिसर अस्वच्छ झालेले आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाने शिव पुतळ्यांची तसेच परिसराची साफसफाई करावी असे म्हटले आहे.