वझरेत शासकीय जागेत स्वतंत्र विद्युत सबस्टेशन उभारण्याची मागणी

आ. दीपक केसरकरांची ऊर्जा राज्यमंत्र्यांशी चर्चा
Edited by:
Published on: July 17, 2025 13:55 PM
views 107  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरासहित संपूर्ण तालुक्यातील वीज समस्यांकडे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे लक्ष वेधले. दोडामार्ग शहरालगत वझरे येथे शासकीय जागेत स्वतंत्र विद्युत सबस्टेशन उभारण्यासोबत महालक्ष्मी विद्युत कंपनी व राज्य शासन यांचा करार पुन्हा करण्यासंदर्भातही श्री. केसरकर यांनी मागणी करत सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणीही केसरकर यांनी केली. मुंबई येथे राज्याच्या ऊर्जा तथा महिला बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांबाबत एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार दीपक केसरकर, यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील समस्यांकडे राज्यमंत्री बोर्डीकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे उपस्थित होते. 

सिधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याच्या बऱ्याशचा डोंगराळ व दुर्गम भागामध्ये अनेकवेळा विज पुरवठा वारंवार खंडीत होत असतो. नागरीकांना १ ते २ आठवडे वीजेपासून बंचीत राहावे लागते. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यासाठी आणखी एक स्वतंत्र विद्युत सबस्टेशन वझरे या ठिकाणी शासकीय जागेत शासनाच्या आरडीएसएस योजने अंतर्गत प्रस्तावित आहे. सदर सबस्टेशनचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे. तरी हे सबस्टेशन होणेबाबत लवकरात लवकर कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रक्लपावर विद्युत निर्मिती करणारी महालक्ष्मी विद्युत प्राईवेट लिमीटड कंपनी ही दोडामार्ग तालुक्यासाठी विद्युत पुरवठा गेली बरीच वर्षे करीत आहे. विद्युत पुरवठा करण्यासाठी राज्य शासन व कंपनीमध्ये करार करण्यात आलेला आहे. परंतू गेल्या एक वर्षा पुर्वी सदरच्या कराराची मुदत संपल्याने महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. कंपनी कडून दोडामार्ग तालुक्याचा विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे या भागा मध्ये विजेची कमतरता भासत आहे. ते पाहता हा करार पुनश्च करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याकडेही श्री. केसरकर यांनी लक्ष वेधले. 

अम्युझमेंट पार्कसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर हवा 

तिलारी धरण प्रकल्प क्षेत्रालगत सुमारे २६० एकर जागेमध्ये राज्य शासनाने अम्युझमेंट पार्क उभारणेच्या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. या ठिकाणी भविष्यात सदर प्रकल्पावर आधारित इतर अनेक प्रकल्प होणार आहेत. त्यामुळे सदर अॅम्युझमेंट पार्क प्रकल्पाकरीता स्वतंत्र ट्रान्सफॉमर किंवा सबस्टेशन होणेबाबत विचार विनिमय करणे अत्यंत गरजेचे आहे. याकडेही बोर्डीकर यांचे लक्ष वेधण्यात आले. 

सावंतवाडीकडेही केसरकर यांनी वेधले लक्ष 

सांवतवाडी शहरासाठी भूमीगत विद्युतवाहीनी (केबल) टाकण्याचे काम मंजूर करण्यात आलेले होते परंतु ते काम रह करण्यात आलेले आहे. तरी सदरचे काम पुन्हा मंजूर होणेसाठी आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वारंवार चक्रीवादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे वीजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यासाठी नव्याने वीजेचे खांब उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. या विषयाचा आढावाही या बैठकीत घेण्यात यावा. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील बहुतांशी भाग हा अत्यंत दुर्गम डोंगराळ, दाट जंगल व आडा झुडपांनी वेढलेला आहे. याभागामध्ये मोठ्या प्रमाणावर दरवर्षी अतिवृष्टी होते. त्यामुळे यामधून गेलेल्या बीज वाहिन्यांवर सातत्याने पावसाळयामध्ये झाडे मोडून पडण्याचे अथवा झाडांच्या फांदया लागून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त आहे. या वाहिन्यंचे बहुतांश लोखंडी पोल, फेब्रीकेशन, डीटीसी स्ट्रक्चर फॅब्रीकेशन, मोठ्या प्रमाणावर सडलेले आहेत. तसेच वीज वाहक तारा जुन्या असल्यामुळे ते तुटून पडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. सदर भाग हा जंगल व डोंगराळ असल्याने रात्रीच्या वेळी स्लाईन फॉल्ट काढण्याकरीता पेट्रोलिंग करणे अत्यंत जोखमीचे असल्याने वोज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विलंब होतो, त्यामुळे त्या वाहिन्यांअंतर्गत येणारी गावे अंधारात राहतात. परिणामी नागरिकांकडून आंदोलन, उपोषणे केली जातात. त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रोषाला दरवर्षी सामोरे जावे लागते. सदर 33 केव्ही वाहिन्या या भूमीगत केल्यास विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण शून्य टक्के वर येणार आहे. व वारंवार उद्भवणारी वीजेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. तसंच सावंतवाडी ईन्सुली ते दोडामार्ग महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. कंपनी पर्यंत नबिन लाईन टाकणे या बाबत बैठकीमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे.


वेंगुर्ला तालुक्यातील चिपीमध्येही सब स्टेशन उभारावे

 वेंगुर्ला तालुक्यांमध्येही वारंवार विज पुरवठा खंडीत होतो त्याकरिता उपकेंद्र होण्यासाठी चिपी विमानतळ येथे उपकेंद्र मंजूर करण्यात आलेले आहे. सदर जागेमध्ये उपकेंद्र मंजूर होऊन वेंगुर्ला किनारपट्टीचा विजेचा प्रश्न कायम स्वरुपी मिटणार आहे. तसेच सध्यस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टी भागामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागा अंतर्गत भुमीगत विद्युत वाहीन्या टाकण्याचे काम सुरु आहे. तरी या दोन्ही विषयाबाबत या बैठकी मध्ये आढावा घेण्यात यावा. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसाय वाढत आहे. सिंधुरत्न योजनेअंतर्गत पर्यटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटक निवास न्याहारी योजना राबवणारा पहिला जिल्हा असल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटनवाढीसाठी टेंड/कॉटेनीस/तत्सम निवासी संकुले (बंगलो सिस्टिम) हो योजना राबविण्यात येत असून सदर योजनेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. सदर योजना ही जिल्ह्यातील प्रत्येक घरासाठी राबविता यावी या अनुषंगाने सदर व्यावसायास व्यावसायीक दराने विजपुरवठा न आकारता घरगुती दराने विजपुरवठा देण्याबाबत चर्चा करुन आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे आहे असेही केसरकर यांनी सुचविले.