केटी बंधारा येथील गणपतीसान्याच्या नूतनिकरणाची मागणी

Edited by:
Published on: March 15, 2025 12:39 PM
views 133  views

कणकवली : शहरातील बिजलीनगर - मराठा मंडळ केटी बंधारा येथील गणपती सान्याचे नूतनिकरण व्हावे अशी मागणी तेलीआळी व बिजलीनगर येथील रहिवाशांनी कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांच्याकडे केली होती. गणपती विसर्जन च्या वेळी गणेश मूर्तीना विराजमान करतेवेळी होत असलेली अडचण मुख्यधिकारी यांना सांगण्यात आली. शहरातील 200 ते 300 गणपती विसर्जन हे या गणपती सान्यावरती होत असल्याने गणेश भक्तांना दरवर्षी अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सुहास परब, अक्षय परब, गौरेश डिचोलकर, महेश कोदे, अजित काणेकर, लक्ष्मण हाण्णीकोड आदी उपस्थित होते.